- Film & Animation
- Music
- Pets & Animals
- Sports
- Travel & Events
- Gaming
- People & Blogs
- Comedy
- Entertainment
- News & Politics
- How-to & Style
- Non-profits & Activism
- Politics Marathi News
- Politics Hindi News
- Crime Marathi
- Crime Hindi
- Agriculture
- Ghost story in Marathi
- Ghost story in Hindi
- Bhakti Sagar Marathi
- Bhakti Sagar Hindi
- Other
NCP Ajit Pawar Sharad Pawar | वेगळं होणं हा पवार काका-पुतण्याचा स्कॅम आहे का ?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फक्त प्रचार नाही… इथे सुरू आहे डावपेचांची लढाई…रणनीतींची युद्धनिती...महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे युती होत आहेत… युती तुटत आहेत आणि राजकारण पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत आहे पण या सगळ्या गोंगाटात एक नाव, एक कुटुंब आणि एक राजकीय समीकरण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे पवार कुटुंब, कधीकाळी एकत्र असलेले काका–पुतणे आज वेगवेगळ्या पक्षांत उभे आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं पक्ष फुटला आणि त्याचबरोबर “पवार कुटुंब फुटलं” असा संदेश जनतेपर्यंत गेला. मात्र त्यानंतर घडलेल्या घटना या दाव्यावर शंका उपस्थित करतात. बंद दाराआडच्या भेटी, काही महानगरपालिकांमध्ये झालेली अनपेक्षित युती, भाजपसोबत सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अजित पवारांनी लावलेला टीकेचा सूर. या सगळ्या गोष्टी एकच संकेत देतात कि हे वेगळेपण तितकं स्पष्ट नाही, जितकं ते दाखवलं जातंय. खरं तर शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिल तर सत्ता टिकवण्यासाठी, योग्य वेळ साधण्यासाठी आणि राजकीय गणित अचूक बसवण्यासाठी त्यांनी नेहमीच धाडसी आणि सोयीचे निर्णय घेतलेले दिसतात. त्यामुळेच आज पवार काका–पुतणे वेगळे होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातला अनपेक्षित भूकंप होता की आधीपासून आखलेली एक रणनीती ? एकीकडे अजित पवार महायुतीत तर दुसरीकडे शरद पवार विरोधात,पण गरज भासली की स्थानिक पातळीवर एकमेकांना पूरक ठरणारी युती, हे काय संकेत देतं ? भाजप जिथे मजबूत आहे तिथे पवारांची जवळीक वाढतेय का? आणि जिथे भाजप अडचणीत आहे तिथे टीकेचा सूर चढतोय का? म्हणजेच पवार कुटुंब वेगळं होणं हे मतभेदांसाठी होतं, की सत्तेच्या भविष्यासाठी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फूट कायमची आहे का? की योग्य वेळ आली की महाराष्ट्र पुन्हा एकदा “पवार कुटुंब एकत्र” हे चित्र पाहणार आहे? या सगळ्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.c...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com