Politics Marathi News

Sudarsahan_Hatkadake
7 Views · 1 month ago

⁣राज ठाकरे इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, ही माझी भविष्यवाणी आहे... तुम्ही हवं तर निकालानंतर पाहा” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये ही भविष्यवाणी केली.ज्या नेत्याने २००६ मध्ये शिवसेनेला पर्याय म्हणून धडाक्यात सुरुवात केली, ज्यांच्या २००९ च्या निकालांनी प्रस्थापितांना घाम फोडला, त्यांच्याबद्दल चक्क 'संपण्याची' भविष्यवाणी केली जातेय? पण फडणवीस असं का म्हणतायत? खरचं राज ठाकरेंचा निर्णय चुकलाय का ? फडणवीसांची भविष्यवाणी खरी होईल का? आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात.


नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti

Sudarsahan_Hatkadake
68 Views · 1 month ago

⁣महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फक्त प्रचार नाही… इथे सुरू आहे डावपेचांची लढाई…रणनीतींची युद्धनिती...महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे युती होत आहेत… युती तुटत आहेत आणि राजकारण पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत आहे पण या सगळ्या गोंगाटात एक नाव, एक कुटुंब आणि एक राजकीय समीकरण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे पवार कुटुंब, कधीकाळी एकत्र असलेले काका–पुतणे आज वेगवेगळ्या पक्षांत उभे आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं पक्ष फुटला आणि त्याचबरोबर “पवार कुटुंब फुटलं” असा संदेश जनतेपर्यंत गेला. मात्र त्यानंतर घडलेल्या घटना या दाव्यावर शंका उपस्थित करतात. बंद दाराआडच्या भेटी, काही महानगरपालिकांमध्ये झालेली अनपेक्षित युती, भाजपसोबत सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अजित पवारांनी लावलेला टीकेचा सूर. या सगळ्या गोष्टी एकच संकेत देतात कि हे वेगळेपण तितकं स्पष्ट नाही, जितकं ते दाखवलं जातंय. खरं तर शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिल तर सत्ता टिकवण्यासाठी, योग्य वेळ साधण्यासाठी आणि राजकीय गणित अचूक बसवण्यासाठी त्यांनी नेहमीच धाडसी आणि सोयीचे निर्णय घेतलेले दिसतात. त्यामुळेच आज पवार काका–पुतणे वेगळे होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातला अनपेक्षित भूकंप होता की आधीपासून आखलेली एक रणनीती ? एकीकडे अजित पवार महायुतीत तर दुसरीकडे शरद पवार विरोधात,पण गरज भासली की स्थानिक पातळीवर एकमेकांना पूरक ठरणारी युती, हे काय संकेत देतं ? भाजप जिथे मजबूत आहे तिथे पवारांची जवळीक वाढतेय का? आणि जिथे भाजप अडचणीत आहे तिथे टीकेचा सूर चढतोय का? म्हणजेच पवार कुटुंब वेगळं होणं हे मतभेदांसाठी होतं, की सत्तेच्या भविष्यासाठी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फूट कायमची आहे का? की योग्य वेळ आली की महाराष्ट्र पुन्हा एकदा “पवार कुटुंब एकत्र” हे चित्र पाहणार आहे? या सगळ्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.c...

instagram link :

/ vishayachbhari

Our Website :

https://vishaychbhari.com

Sudarsahan_Hatkadake
97 Views · 1 month ago

⁣मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा तासभर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सडकून टीका केली. पण कुणावर ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यात ते सत्तेत आहेत त्या भाजपवर. मंडळी 2019 च्या निवडणुका भाजप आणि अखंड शिवसेनेन एकत्रित लढवल्या. मात्र मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये बिनसलं. शिवसेनेन भाजप पासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर 2021 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सरकार तयार झाल्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार आहे की भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार असं सरकार आहे, याविषयी संभ्रम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसल्याचं म्हटलं होतं. पुढच्या दोन दिवसात शरद पवारांनी सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यामुळ हे सरकार गंडल. पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे. तीन दिवसात हे सरकार कोसळलं. मात्र यामध्ये अजितदादांची अपुरी काम पूर्ण झाली आणि या तीन दिवसात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाली असं बोलल जात.. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय घडलं होतं हे सांगितल. "शरद पवारांना आम्ही शपथ घेणार हे माहीत होतं. त्यांच्या संमतीन सगळं झालं. पण नंतर त्यांनी धोका दिला", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र राजकीय वर्तुळात, माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला नव्हता,तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र मिळून ही खेळी होती अशी चर्चा झाली. यावर शरद पवारांनी मात्र बोलन टाळलं. "महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळ चांगली गोष्ट एकच घडली की, राष्ट्रपती राजवट उठली", एवढं बोलून शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र शपथविधी बाबत त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. समझनेवालो को इशारा काफी है. पण मंडळी या सगळ्या नाट्यातून एक एक प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलाय. की खरंच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कामापुरता मामा करून घेतायेत का ? बरं हा प्रश्न का उपस्थित होतोय? हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.c...

instagram link :

Mayvideo
59 Views · 1 month ago

⁣पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) निवडणूक २०२६ मध्ये आता रंगत वाढली आहे. ज्या शहराला अजित दादांनी 'Brand Pimpri-Chinchwad' बनवलं, तिथेच आता भाजपने त्यांना जोरदार आव्हान दिलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकारण तापलं आहे.अजित पवारांनी भाजपच्या ९ वर्षांच्या सत्तेत झालेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत, तर दुसरीकडे Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली महेश लांडगे आणि जगताप कुटुंबीयांनी भाजपचा गड मजबूत केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपरी-चिंचवडच्या सत्तेचं नेमकं गणित काय आहे?

नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti