Ajit pawar : दादांनी Devendra Fadnavis यांना फक्त कामापुरता मामा बनवलंय का ?

91 Tampilan· 07/01/26
Sudarsahan_Hatkadake
0
Di

⁣मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा तासभर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सडकून टीका केली. पण कुणावर ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यात ते सत्तेत आहेत त्या भाजपवर. मंडळी 2019 च्या निवडणुका भाजप आणि अखंड शिवसेनेन एकत्रित लढवल्या. मात्र मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये बिनसलं. शिवसेनेन भाजप पासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर 2021 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सरकार तयार झाल्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार आहे की भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार असं सरकार आहे, याविषयी संभ्रम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसल्याचं म्हटलं होतं. पुढच्या दोन दिवसात शरद पवारांनी सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यामुळ हे सरकार गंडल. पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे. तीन दिवसात हे सरकार कोसळलं. मात्र यामध्ये अजितदादांची अपुरी काम पूर्ण झाली आणि या तीन दिवसात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाली असं बोलल जात.. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय घडलं होतं हे सांगितल. "शरद पवारांना आम्ही शपथ घेणार हे माहीत होतं. त्यांच्या संमतीन सगळं झालं. पण नंतर त्यांनी धोका दिला", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र राजकीय वर्तुळात, माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला नव्हता,तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र मिळून ही खेळी होती अशी चर्चा झाली. यावर शरद पवारांनी मात्र बोलन टाळलं. "महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळ चांगली गोष्ट एकच घडली की, राष्ट्रपती राजवट उठली", एवढं बोलून शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र शपथविधी बाबत त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. समझनेवालो को इशारा काफी है. पण मंडळी या सगळ्या नाट्यातून एक एक प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलाय. की खरंच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कामापुरता मामा करून घेतायेत का ? बरं हा प्रश्न का उपस्थित होतोय? हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.c...

instagram link :

Menampilkan lebih banyak

 0 Komentar sort   Sortir dengan